युनायटेड किंग्डमचा शाही खजिना

या विषयातील रहस्ये उलगडा.

युनायटेड किंग्डमचा शाही खजिना

युनायटेड किंग्डमचा शाही खजिना, इंग्लंडचा शाही खजिना, युनायटेड किंग्डमचे क्राऊन ज्वेल्स किंवा इंग्लंडचे क्राऊन ज्वेल्स हा इंग्लंडच्या लंडन शहरातील टॉवर ऑफ लंडन येथे ठेवलेला निवडक खजिना आहे. यात युनायटेड किंग्डमच्या राज्यकर्त्यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी घातली जाणारी वस्त्र-आभूषणे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

या खजिन्यात २३,५७८ हिरे, माणिक, मोती आणि इतर मौल्यवान खडे आहेत. राज्यकर्ते घालत असलेला सेंट एडवर्डचा मकुट, कोहिनूर, कलिनन-१ आणि कलिनन-२ हे हिरे, स्टुअर्ट पाचू, ब्लॅक प्रिन्सचा माणिक, इ. बेशकिमती रत्ने आणि भवानी तलवारी सारख्या अनेक एकमेव आणि दुर्मिळ वस्तू या खजिन्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →