युक्तेश्वर गिरी (श्रीयुक्तेश्वर असेही लेखन) (बंगाली : শ্রী যুক্তেশ্বর গিরী)(मे १०, इ.स. १८५५ - मार्च ९, इ.स. १९३६) हे प्रियनाथ कारार (बंगाली : প্রিয়নাথ কাঁড়ার) यांचे आध्यात्मिक जीवनातील नाव आहे. ते सत्यानंद गिरी व परमहंस योगानंद यांचे गुरू होते. युक्तेश्वर हे शिक्षक, खगोलविद, ज्योतिषी, योगी आणि भगवद्गीता व बायबलवर श्रद्धा असणारे सत्पुरुष होते. वाराणसीचे लाहिरी महाशय हे युक्तेश्वरांचे गुरू होते. स्वामी परंपरेतील गिरी शाखेचे ते सदस्य होते. योगानंद मुक्तेश्वरांना ज्ञानावतार समजत असत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युक्तेश्वर गिरी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.