यष्टिचीत

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

क्रिकेटच्या खेळात यष्टिचीत(stumped-out) हा फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.

यष्टिचीत होण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे -



टाकलेला चेंडू नो-बॉल असता कामा नये. वाईड चेंडू चालतो.

खेळत असलेला फलंदाज धाव काढण्याचा प्रयत्‍न सोडून अन्य कारणास्तव आपली क्रीझ सोडून पुढे गेलेला असला पाहिजे.

चेंडू बॅटला न लागता यष्टिरक्षकाकडे गेला पाहिजे.

फलंदाज धाव काढण्याच्या प्रयत्नात असता कामा नये. असे असल्यास फलंदाज धावचीत समजला जाईल.

यष्टिरक्षकाने चेंडू यष्टीवर फेकून मारून अथवा चेंडू हातात ठेवून आपल्या त्याच हाताने यष्टी मोडली पाहिजे.

या क्षणी फलंदाज क्रीझच्या बाहेर पाहिजे.

यष्टिचीत झालेल्या फलंदाजाबद्दल गोलंदाजाला व यष्टिरक्षकाला श्रेय देण्यात येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →