मोगरा

या विषयातील रहस्ये उलगडा.

मोगरा

मोगरा (शास्त्रीय नाव-Jasminum sambac

कुल(Family) - Oleaceae

एक प्रकारचे अत्यंत सुवासिक फूल आहे. याच्या वेलीचा झुडपासारखा विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलापासून अत्तरही तयार करण्यासाठी वापरले जाते. मोगऱ्याचे फूल पांढऱ्या रंगाचे असते त्याला बिया नसतात. हे फुल २.५ सेमीचे असते. याचे दोन प्रकार आहेत .

१) अनेक पाकळीचे - यालाच बट मोगरा म्हणतात.

२) ६ पाकळ्याचे.

3) हजारी मोगरा

मोगऱ्याचे झाड चांगले वाढवण्यासाठी त्याला वसंत ऋतूच्या सुरुवातीला शेणखत घालतात. त्यानंतर मोगऱ्याची पाने वाढतात आणि पुढे कळ्यांचा बहर येतो. मोठ्या मोगऱ्याला आधार लावल्यास वाढीस मदत होते. फुलं येऊन गेल्यावर त्या भागाची छाटणी करतात.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →