मोनमथ काउंटी (इंग्लिश: Monmouth County) ही अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याच्या मध्यवर्ती भागातील एक काउंटी आहे. तिच्या उत्तरेस रॅरिटन उपसागर, पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस ओशन काउंटी, तर पश्चिमेस मर्सर आणि मिडलसेक्स या काउंट्या आहेत. ही काउंटी न्यू यॉर्क महानगर प्रदेश आणि न्यू जर्सीच्या जर्सी शोर या किनारी प्रदेशाचा भाग आहे.
२०२० च्या अमेरिकेच्या जनगणनेनुसार, काउंटीची लोकसंख्या ६,४३,६१५ होती. २०२५ च्या अंदाजानुसार ती ६,५१,०३५ होती. फ्रीहोल्ड बरो हे काउंटीचे प्रशासकीय मुख्यालय आहे. पर्यटन, शेती आणि वैज्ञानिक संशोधन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख क्षेत्रे आहेत. जून १७७८ मध्ये झालेल्या मॉनमथच्या लढाईमुळे या काउंटीला अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
मॉनमाउथ काउंटी, न्यू जर्सी
या विषयातील रहस्ये उलगडा.