मेळघाट विधानसभा मतदारसंघ - ४१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मेळघाट मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा ही २ तालुके आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा, पथ्रोट ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. मेळघाट हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
भारतीय जनता पार्टी पक्षाचे श्री.केवलराम काळे हे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मेळघाट विधानसभा मतदारसंघ
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.