मेरी क्युरी

या विषयावर तज्ञ बना.

मेरी क्युरी

मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७, पोलंड - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो. नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या महिला तसेच दोन वेगळ्या संशोधन क्षेत्रात नोबेल मिळविणाऱ्या संशोधक असे दोन्ही विक्रम त्यांच्या नावेच नोंदविण्यात आलेले आहेत. त्यांना मिळालेले पहिले नोबेल पारितोषिक मेरी व त्यांचे पती यांना संयुक्तपणे देण्यात आले होते. पती-पत्नी उभयतांना एकत्रित नोबेल पुरस्कार मिळण्याचा विक्रमही त्यांच्याकडेच जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →