मेघालय उच्च न्यायालय

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मेघालय उच्च न्यायालय हे मेघालय राज्याचे उच्च न्यायालय आहे. भारताच्या राज्यघटनेत आणि उत्तर-पूर्व क्षेत्र (पुनर्रचना) कायद्यात (१९७१) योग्य सुधारणा करून मार्च २०१३मध्ये याची स्थापना करण्यात आली. यापूर्वी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे मेघालय राज्याचा अधिकार होता. उच्च न्यायालयाची जागा मेघालयची राजधानी शिलाँग येथे आहे.

या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या माननीय मुख्य न्यायाधीश आणि ३ माननीय न्यायाधीशांसह ४ स्थायी न्यायाधीश आहे. सध्याचे सरन्यायाधीश हे माननीय न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी आहेत ज्यांनी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी पदभार स्वीकारला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →