मेंदी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. स्त्रिया या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्यप्रसाधनासाठी करत आहेत. अनेक सणांमध्ये/धार्मिक कार्यक्रमात मेंदीची कलाकुसर हातावर काढण्यात येते. हिचा वापर करून पांढरे केसही रंगविले जातात. मेंदीचा लेप बनवताना त्यात लिंबू पिळतात, म्हणजे हातावरच्या नक्षीला छान लाल रंग येतो.
मेंदीची नावे:-
हिंदी - मेहॅंदी
इंग्रजी - Henna., Egyptian Private (?)किंवा Turry Mignonette (?)
शास्त्रीय नाव - ‘लॉसोनिया अल्बा’ आणि ‘लॉसोनिया इनरमिस (Lawsonia inermis)
कानडी - कोरांत, मदरंगा
संस्कृत - मेंधिका, मेंधी, चमेदिका, नखरंजक, रागांगी, यवनेष्टा
हात किंवा केस रंगवायला वापरण्यात येणारी मेंदीची पावडर ही मेंदीच्या पानांपासून बनविली जाते.
मेंदी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.