मॅट हेन्री

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मॅथ्यू जेम्स हेन्री (जन्म १४ डिसेंबर १९९१) हा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो कॅंटरबरी ह्या स्थानिक संघ तसेच इंग्लंडमधील वूस्टरशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा एक तेज-मध्यमगती गोलंदाज आहे.

त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३१ जानेवारी २०१४ रोजी भारताविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केले. त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४ डिसेंबर २०१४ झालेल्या १ल्या टी२० सामन्यात केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →