मृणालिनी साराभाई

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मृणालिनी साराभाई (माहेरच्या मृणालिनी स्वामिनाथन) (११ मे, इ.स. १९१८:केरळ - २१ जानेवारी, इ.स. २०१६:अहमदाबाद) या एक भारतीय नर्तकी होत्या. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. त्या भरतनाट्यम आणि कथकली या नृत्यकलेत पारंगत होत्या. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्‍नी होत. स्वित्झर्लंडला जाऊन तेथे त्यांनी रशियन बॅले व ग्रीक नृत्ये यांचे अध्ययन केले. भारत सरकारने इ.स. १९९२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →