मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - ३२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार मुर्तिजापूर मतदारसंघात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी ही दोन तालुके आणि अकोला तालुक्यातील कुरणखेड हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. मुर्तिजापूर हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.
भारतीय जनता पक्षाचे हरीश मारोतीअप्पा पिंपळे हे मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.