मुबारक शेख

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मुबारक शेख हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांचे लेखन १९८० सालापासून प्रकाशित झाले आहे. कवी मुबारक शेख यांच्या अनेक कविता महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी मुक्त छंदात संवेदनशील असा अनेक नावीन्यपूर्ण रचना लिहिल्या आहेत. ते मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य आहेत. एक उत्कृष्ट गझलकर म्हणून आतापर्यंत त्यांना शंभरपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. गिरणी कामगाराच्या पोटी जन्माला आलेल्या मुबारक शेख यांच्या मराठी गझला प्रेमकवितेत कधीच गुंतून पडल्या नाहीत. त्यांनी ‘नमाज आणि महाआरती’ या कथासंग्रहातून गोरगरीब मुसलमानांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. ‘काट्यांचे ऋण’ या त्यांच्या पहिल्या गझलसंग्रहापासून ‘दहशतनामा’पर्यंतचा प्रवास भारतीय मुसलमानांची शोकांतिका व्यक्त करणारा आहे.

त्यांची काही पुस्तकेदेखील प्रकाशित झाली आहेत. त्यांत 'नमाज आणि महाआरती', 'पायरव', 'काट्यांचे ऋण', 'सत्यमेव जयते', 'आगाज', 'शिवनामा', 'दहशतनामा' या बहुचर्चित पुस्तकांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‌‘शि‍वनामा’ हा आगळावेगळा काव्यसंग्रह 2015 साली प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रह त्यांचा वेगळेपणा अधोरेखित करणारा आहे. यात मुबारक शेख यांनी कवितेचे निरनिराळे आकृतिबंध वापरून शि‍वचरित्राची काव्यात्मक मांडणी केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →