मुग्धभ्रांति : (डेलिरियम्). मेंदूच्या बोधनीय, प्रतिबोधनीय व बौद्धिक कार्यात कोणत्याही कारणामुळे जेव्हा तीव्र बाधा येते तेव्हा मुग्धभ्रांती हा मानसचिकित्सीय लक्षणसमूह नेहमी आढळून येतो. याला साध्या भाषेत ‘भ्रम’ किंवा ‘भ्रमिष्टपणा’ असे म्हणतात. पाश्चिमात्य देशांत रुग्णालयातील रुग्णांच्या शारीरिक विकारांत या लक्षणांचे प्रमाण ५% ते १०% असते तसेच तेथील वयाची साठी ओलांडलेल्या वृद्ध रुग्णांत हे प्रमाण ५०% पर्यंत आढळून आलेले आहे. भारतीयात मुग्धभ्रांतीचे प्रमाण कमी असायचे कारण येथील अल्प आयुर्मर्यादा हे होय.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुग्धभ्रांति
यामागील विज्ञान आणि इतिहास.