मालगुडी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मालगुडी

मालगुडी हे एक काल्पनिक गाव असून हे आर.के. नारायण यांच्या कादंबऱ्या आणि लघुकथांमध्ये वापरले जाते. हे गाव दक्षिण भारतातील रामनाथपुरममध्ये असल्याचे दाखवले जाते. याचा उल्लेख आर.के. नारायण यांच्या जवळपास सर्व पुस्तकांत आहे. स्वामी अँड फ्रेंड्स या त्यांच्या पहिल्या कादंबरीपासून सुरुवात करून, त्यांच्या पंधरा कादंबऱ्यांपैकी एक वगळता बहुतेक सर्वच कादंबऱ्यातील कथा आणि त्यांच्या इतर लघुकथा येथेच घडतात.



नारायण हे मालगुडीला भारताचे एक लहान जग म्हणून चित्रित करण्यात अत्यंत यशस्वी ठरले. मालगुडी डेज या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे मालगुडीची निर्मिती १९व्या शतकात सर फ्रेडरिक लॉली या काल्पनिक ब्रिटिश अधिकारी यांनी काही गावे एकत्र करून आणि विकसित करून केली होती. सर फ्रेडरिक लॉलीचे पात्र १९०५ मध्ये मद्रासचे तत्कालीन गव्हर्नर आर्थर लॉली यांच्यावर आधारित असावे असे मानले जाते.

शिमोगा लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी शिमोगा-तलागुप्पा रेल्वे मार्गावरील अरसालू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मालगुडी रेल्वे स्थानकात बदलण्याची विनंती भारतीय रेल्वेला केली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →