मार्सिया गे हार्डन (जन्म १४ ऑगस्ट १९५९) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. १९९० मध्ये मिलर्स क्रॉसिंग या चित्रपटात तिला यश मिळाले. २००० च्या पोलॉक या चरित्रात्मक चित्रपटातील कलाकार ली क्रॅस्नरच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. मिस्टिक रिव्हर (२००३) या नाट्यचित्रपटात त्रासलेली पत्नी म्हणून तिच्या अभिनयासाठी तिला दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले. तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये द फर्स्ट वाइव्हज क्लब (१९९६), फ्लबर (१९९७), स्पेस काउबॉय (२०००), मोना लिसा स्माइल (२००३), आणि फिफ्टी शेड्स फिल्म सीरिज (२०१५-१८) यांचा समावेश आहे.
हार्डनने १९९३ मध्ये ब्रॉडवेमध्ये पदार्पण केले, टोनी कुशनरच्या एंजल्स इन अमेरिका या नाटकात अभिनय केला ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीच्या टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २००९ मध्ये ती याझमिना रेझा यांच्या गॉड ऑफ कार्नेज या विनोदी नाटकातून ब्रॉडवेवर परतली व तिच्या अभिनयाने तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळावला .
हार्डनच्या दुरदर्शन कामांमध्ये एचबीओ मालिका द न्यूजरूम (२०१३–२०१४), एबीसी मालिका हाऊ टू गेट अवे विथ मर्डर (२०१५–२०२०) आणि ॲप्प्ल टीव्ही+ मालिका द मॉर्निंग शो (२०१९–सध्या) आहे. सोबतच सीबीएस मालिका कोड ब्लॅक (२०१५-१८) आणि सो हेल्प मी टॉड (२०२२-२४) मधील मुख्य भूमिका आहे. गुन्हे-नाट्य मालिका लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट आणि द करेजियस हार्ट ऑफ इरेना सेंडलर (२००९) या दूरचित्रवाणी मालिकांसाठी तिच्या सहाय्यक भूमिकेसाठी तिला प्राइमटाइम एमी पुरस्कार नामांकन मिळाले.
मार्सिया गे हार्डन
या विषयातील रहस्ये उलगडा.