मार्क फ्रॉयडर नॉप्फ्लर (१२ ऑगस्ट, १९४९:ग्लासगो, स्कॉटलंड - ) हा एक ब्रिटिश संगीतकार आहे. हा १९७७ ते १९९५ या काळात डायर स्ट्रेट्स या रॉक संगीतसमहाचा (बँड) प्रमुख गिटारवादक, गायक आणि गीतकार होता. नॉप्फलर आणि बेस वादक जॉन इल्सली हे दोघे डायर स्ट्रेट्सच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा भाग होते. डायर स्ट्रेट्स बँड बरखास्त झाल्यानंतर नॉप्फलरने स्वतंत्रपणे संगीत तयार केले. आता तो एक स्वतंत्र कलाकार आहे.
नॉप्फ्लरचा जन्म ग्लासगो येथे झाला आणि त्यांचे संगोपन न्यूकॅसल येथे झाले. लीड्स विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने तीन वर्षे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. नॉप्फ्लरने त्याचा धाकटा भाऊ डेव्हिड नॉप्फ्लर याच्यासोबत डायर स्ट्रेट्सची स्थापना केली. या बँडने ब्रदर्स इन आर्म्स (१९८५) सह सहा संगीतसंच प्रकाशित केले. ब्रदर्स इन आर्म्स हा इतिहासातील सर्वाधिक विकल्या गेलेल्या अल्बमपैकी एक आहे. १९९५ मध्ये डायर स्ट्रेट्स बरखास्त झाल्यानंतर नॉप्फ्लरने आतापर्यंत दहा वैयक्तिक संगीतसंच प्रकाशित केले आहेत. याशिवाय त्याने लोकल हिरो (१९८३), कॅल (१९८४), द प्रिन्सेस ब्राइड (१९८७), वॅग द डॉग (१९९७) आणि अल्तामिरा (२०१६) यासह नऊ चित्रपटांसाठी चित्रपट संगीताची रचना आणि निर्मिती केली आहे. त्यांनी टिना टर्नर, बॉब डिलन, आणि रँडी न्यूमन यांच्यासाठी संगीतनिर्मिती केली आहे.
क्लासिक रॉक मासिकाने नॉप्फलरला संगीतपंडित म्हणले आहे, त्याने नॉप्फ्लर फिंगरस्टाइल गिटारवादनाची पद्धत सुरू केली. नॉप्फलरला रोलिंग स्टोनच्या सर्वकालीन १०० महान गिटारवादकांच्या" यादीत २७वे स्थान आहे. डायर स्ट्रेट्ससह नॉप्फ्लरने यांनी १० ते १२ कोटी रेकॉर्डची विक्री केली. नॉप्फलरला चार वेळा ग्रॅमी पुरस्कार, एडिसन पुरस्कार, स्टायगर पुरस्कार आणि आयव्हर नोव्हेलो पुरस्कार मिळाले आहेत. युनायटेड किंग्डममधील विद्यापीठांनी त्याला संगीतातील तीन मानद डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. २०१८ मध्ये डायर स्ट्रेट्सचे सदस्य म्हणून नॉप्फलरला रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम मध्ये स्थान दिले गेले.
मार्क नॉप्फलर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.