मारिया शारापोव्हा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मारिया शारापोव्हा

मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →