मायराणी ही महाराष्ट्रात लोकपरंपरेने पुजली जाणारी देवता आहे. महाराष्ट्रात हिचा आयराणी म्हणून सुद्धा उल्लेख होत असे. हिचे उत्तर भारतात 'माताराणी' नावाच्या देवतेशी नामसाधर्म्य दिसते. केतकर ज्ञानकोशात 'मायराणी' देवीचा उल्लेख (भा. इ. सं. मं. वार्षिक इतिवृत्त, १८३८चा हवाला देऊन) आहे त्यात मायराणीचे देऊळ कुठेही आढळत नसल्याचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांच्या दासबोधात ' जळीच्या मेसको मायेराणी । ' असाही उल्लेख येतो (या ओळीत मेसकोचा आदरार्थी उल्लेख मायेराणी आहे अथवा मायराणीचा उल्लेख स्वतंत्र आहे ते स्पष्ट होत नाही) त्या उल्लेखावरून या कदाचित जलदेवता असू शकतील. ब्रिटिशकालीन बिजापूर गॅझेटिअर (इ.स.१८८४)मध्ये भटक्या आणि भिक्षामागून उदरनिर्वाह करणाऱ्या संख्येने अत्यल्प भट समुदाय सिधोबाच्या प्रतिमेसोबतच मायराणीची प्रतिमा बाळगत असल्याचा उल्लेख येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मायराणी (देवता)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.