माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे.
गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे.
हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत.
या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे. दर आठवड्याला थोडे थोडे याप्रमाणे हे पुस्तक लिहिले गेले आणि १९२५ ते १९२९ या काळात ते त्यांच्या नवजीवन या नियतकालिकात प्रसिद्ध केले गेले. 'यंग इंडिया' मध्ये त्याचे इंग्रजी भाषांतर छापले जायचे. स्वामी आनंद यांनी या प्रकल्पाला चालना दिली आणि गांधीजींच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या सार्वजनिक लढायांची पार्श्वभूमी कळावी म्हणून हे प्रसिद्ध करावे असे त्यांना भरीस घातले. जागतिक आध्यात्मिक व धार्मिक अधिकार असलेल्या तज्ञांच्या समितीने, १९९९ मध्ये '१०० आध्यात्मिक पुस्तकातील एक' असा या पुस्तकाचा गौरव केला.
हा भाग महादेव देसाई यांनी लिहिला आहे. त्यांनी १९४० मध्ये या पुस्तकाचे गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतर केले. या प्रस्तावनेत देसाई म्हणतात की मुळात हे पुस्तक दोन भागात लिहिले गेले होते, पहिला भाग १९२७ मध्ये आणि दुसरा १९२९ मध्ये! ते असाही उल्लेख करतात की मूळ पुस्तकाची किमात रु.१ होती आणि ही प्रस्तावना लिहीपर्यंत पाच आवृत्तींचे प्रकाशन झाले होते. गुजरातीमधील ५०००० पुस्तकांची विक्री झाली होती परंतु इंग्रजी पुस्तक महाग असल्याने लोक विकत घेत नव्हते. इंग्रजी पुस्तक स्वस्तात उपलब्ध करून दिले पाहिजे असे देसाई म्हणतात. ते हाही उल्लेख करतात की एका इंग्रज विद्वानाने संपूर्ण भाषांतराचे संस्करण केले आहे परंतु त्यांना नामोल्लेख नको होता. पाचव्या भागातील प्रकरण २९-४० चे भाषांतर देसाई यांचे सुहृद प्यारेलाल यांनी केले आहे.
माझे सत्याचे प्रयोग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.