महाराष्ट्र राज्य रंगभूमी आणि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नाटकांसाठीचे सेन्सॉर बोर्ड म्हणून ओळखले जाते.मंडळाचे अरुण नलावडे हे अध्यक्ष आहेत.२०१७ साली वर्षभरात मराठीच्या १ हजार २६९ संहिता मंडळा कडे आल्या. तर हिंदीच्या ४७४ संहिता आल्या. प्रत्येक महत्त्वाच्या शहरातून एक व्यक्ती मंडळावर आहे. आधी ४० ते ४२ सदस्य होते, आता एकूण ५५ सदस्य आहेत. व्यावसायिक नाटकासाठी १००० रुपये फीस आकारली जाते.[१]

रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ पुढील सेवा देते: १) एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे २) ऑर्केस्ट्रा तमाशा,मेळा,नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे.३) नाट्य संहितांना प्रमाणपत्र देणे [२]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →