मतदार नोंदणी ही बहुतांश प्रगत देशात आपोआप होते, ज्यापैकी अनेक देश हे लोकशाही पद्धतीचे आहेत. मतदार नोंदणी ही काही देशांमध्ये त्या मतदाराने मतदान करण्यापूर्वीची एक आवश्यकताही आहे. मतदार यादीत नांव नोंदविण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी/देशात असलेल्या याचे नियमांत अंतर आहे. एखाद्या नागरिकाने अथवा रहिवाश्याने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी काही विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे व तेथील काही विशिष्ट पद्धतीचे अनुसरण करणे जरुरी आहे. काही ठिकाणी वय हा अनिवार्य घटक आहे तसेच काही ठिकाणी तो ऐच्छिक आहे. मतदारांचे नोंदणीसाठी घेण्यात येणाऱ्या अभियानास मतदार नोंदणी अभियान असे म्हणतात.
काही देशात मतदानास ईच्छुक व्यक्तिने आवश्यक ते प्रपत्र आवश्यक दस्तावेजासह भरून द्यावयास हवे व ते तेथील संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर करावयास हवे. त्यांना, निवासाचा पत्ता बदलल्यास, विशिष्ट प्रपत्र भरून पुनर्नोंदणीही करावी लागू शकते. याशिवाय, काही ठिकाणी, तेथील शासनाकडे वाहन परवान्याचे मागणीचे वेळी एखाद्याने नाव नोंदविल्यास, त्याचे वय बघुन, त्या नागरिकाची मतदानाच्या यादीत आपोआप नोंदणी होऊ शकते.
मतदार नोंदणी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.