मणिपूर विधानसभा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मणिपूर विधानसभा

मणिपूर विधानसभा हे भारताच्या मणिपूर राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या मणिपूर विधानसभेचे कामकाज इम्फाल शहरामधून चालते. भारतीय जनता पार्टीचे युम्नान खेमचिंद सिंह हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह विधानसभेचे नेते आहेत.

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे मणिपूर विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १०वी विधानसभा २०२२ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीने ३२ जागांवर विजय मिळवून राज्यातील सत्ता राखली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →