मकाओ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मकाओ

मकाओ (देवनागरी लेखनभेद: मकाउ, मकाव) हा चीन देशाच्या दोन विशेष शासकीय प्रदेशांपैकी एक आहे (दुसरा प्रदेश: हाँग काँग). मकाओ हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे.

मकाओ ही चीनमधील पहिली व शेवटची युरोपीय वसाहत होती. पोर्तुगीज व्यापारी १६व्या शतकामध्ये येथे स्थायिक झाले व तेव्हापासून मकाओ हे पोर्तुगाल देशाचे एक प्रजासत्ताक होते. डिसेंबर २०, १९९९ रोजी मकाओची मालकी चीनकडे हास्तांतरीत करण्यात आली. ह्यावेळी करण्यात आलेल्या करारांच्या अंतर्गत मकाओला अनेक स्वायत्त अधिकार देण्यात आले जे २०४९ सालापर्यंत लागू राहतील.



मकाओ हाँग काँगच्या ६० किमी नैऋत्येस व ग्वांगझू शहरापासून १४५ किमी अंतरावर वसले आहे. मकाओ हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा प्रदेश आहे. २९.२ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या शहरात ५ लाख ४६ हजार लोक राहतात (घनता: १८,७०५ प्रती किमी²).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →