देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादन (gross domestic product) जर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात.
यामुळे अर्थकारण मंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था (बँका) अधिक हमी मागतात. विमा कंपन्या त्यांच्या हप्त्यांचे दर वाढवतात. उद्योग जोखिम घेऊ शकत नसल्याने गुंतवणूक मंदावते, काही वेळा थांबते.
नवीन गुंतवणूक नाही आणि वाढीची संधी दिसत नसल्याने अर्थिक जोखीम कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर कपाती केल्या जातात. त्यामुळे लोकांचा खर्च करण्याचा कल कमी होतो. पैसा बाजारात् येईनासा होतो.
अशा रितीने सर्वच अर्थ व्यवस्था थंडाऊ लागते.
2020 हे वर्ष जागतिक मंदी असल्याचे दिसून येत आहे.
या वर्षात Coronavirus या संसर्गजन्य रोगामुळे जागतिक मंदीचे सावट दिसून येते. कच्च्या तेलाच्याच्या बाबतीत तर खूप मोठा उतार दिसून येत आहे. 1987चा कच्चा तेलाच्या भावा पेक्षा आता मार्च 2020 मध्ये कच्चा तेलाचा भाव कमी झाला आहे.
मंदी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?