मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असे सुद्धा म्हणले जाते. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे.
हा एक खडकाळ ग्रह (terrestrial planet) असून त्यावरील वातावरण विरळ आहे. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत ऑलिंपस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावरच आहे. तसेच जून २००८ मध्ये नेचर मासिकात प्रकाशित झालेल्या तीन लेखांनुसार मंगळावर एक प्रचंड मोठे विवर असल्याचा पुरावा मिळाला आहे. हे विवर १०,६०० X ८,५०० किमी अकाराचे असून ते साउथ पोल - ऐटकेन बेसिन या सद्ध्याच्या ज्ञात सर्वांत मोठ्या विवरापेक्षा चारपट मोठे आहे. भूपृष्ठीय गुणधर्मांप्रमाणेच मंगळाचा परिवलन काळ तसेच ऋतुचक्र पृथ्वीसारखेच आहेत.
१९६५ मध्ये पहिल्यांदा मरीनर ४ हे अंतराळायान मंगळाजवळून गेले. त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता. याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरिक्षण करतांना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडद पट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले. तसेच मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता. नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ ऑप्टिकल इल्यूजन मुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. पण तरीही, इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून, जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची सर्वाधिक शक्यता आहे. बर्फाच्या स्वरूपातील पाणी जुलै ३१, २००८ रोजी फोनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर आढळले होते.
मंगळावर शोध शतकांपासून पासून चालू आहे, १६०० पासून तेलेस्कॉपेच्या शोधानंतर मंगळवारच्या घडामोडी मनुष्याला बारकी ने पाहता आल्या पृथ्वी वरून मंगळाच्या वातावरण आणि संभावित जीव जंतूचा शोध सोपा झाला आहे मंगळावर बरेच शोध्यान पाठवलेले आहे विसाव्या षटका पासून मानाग्लावर मनुष्य ज्ञान खूप वाढला आहे मुख्य क्षेत्रा बद्दल माहिती आणि तिथल्या परिस्थितीची माहिती ग्रह विज्ञान खूप किचकट आहे म्हणून मार्स एक्ष्प्लोरतिओन मध्ये खूप निस्श्फल्लता आल्या मुख्यातर सुरुवातीच्या शोधन मध्ये जवळ जवळ two -third अवकाशयान मंगळावर पोहचू शकले नाहीत आणि काही पोहचून पण काही शोध करू शकले नाही आहे पण सगळी कामगिरी चुकली नाही उधरानार्थ twin mars exploration रोवेर्स खूप वर्षांपर्यंत आपला काम करीत होते. ६ ऑगस्ट २००६ पासून दोन रोवेर्स मंगळावरील माहिती पृथ्वी वर पाठवत आहे आणि तीन orbitors ग्रह वर पाहणी करत आहे - Mars Odyssey, Mars Express, and Mars Reconnaissance Orbiter. आज पर्यंत एकही sample गोळा करण्यासाठी यान मंगळावर पाठवला नाही आहे आणि एक यान (Fobos-Grunt)sample आणू शकले नाही आहे.
मंगळ अन्वेषण
या विषयावर तज्ञ बना.