मंगल ढिल्लन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मंगल ढिल्लन

मंगल सिंह ढिल्लन (१८ जून १९५७ - ११ जून २०२३) हे एक भारतीय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता होते. त्यांचा जन्म पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा जवळील वंडर जटाना येथे झाला. त्यांनी दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांमध्ये अनेक सहाय्यक भूमिका साकरल्या.

ढिल्लन यांनी दिल्लीत नाट्य क्षेत्रात काम केले आणि १९७९ मध्ये पंजाब विद्यापीठ, चंदिगढ येथे भारतीय नाट्य विभागात प्रवेश घेतला आणि १९८० मध्ये अभिनयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

ढिल्लन यांनी १९९४ मध्ये कलाकार रितू ढिल्लन यांच्याशी लग्न केले; या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

११ जून २०२३ रोजी पंजाबमधील लुधियाना येथे कर्करोगाने दीर्घकाळ ग्रस्त राहिल्यानंतर ढिल्लन यांचे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →