भेकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

भेकर

भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरून पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.

याचा वावर पूर्व भारतात जास्त आहे. महाराष्ट्रातही याचा वावर बहुतेक जंगलात आहे. परंतु कोकणात याची नोंद विरळपणेच झालेली आहे. सह्याद्रीतील जंगलात बरेचदा हे हरीण दृष्टीस पडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →