भेंडलावा (पक्षी)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भेंडलावा (पक्षी)

भेंडलावा, इस्नाप, इस्नाफ, खेंकस, टिलवा, तिबड, टिंबा, टिंबली, तामण किंवा तई (इंग्लिश:Painted Snipe; हिंदी:राजचहा; संस्कृत:चित्रित कुणाल; गुजराती:पानलवा, पान लौवा) हा एक पक्षी आहे.



आकाराने लाव्यापेक्षा मोठा.सरळ बारीक पाणलाव्यासारखी चोच.टोकाला बाक.वरून हिरवाकंच.त्यावर बदामी,काळपट काड्या व रेघोट्या.खालून तपकिरी पांढरा.डोळ्यांभोवती पांढरे वर्तुळ.डोळ्यांजवळ पांढरा डाग.खांद्यावर पांढरी पट्टी.नर मादीपेक्षा कमी देखणा.मादीच्या गळ्यावर आणि छातीवर तपकिरी,तसेच,काळा रंग नसतो.

उडताना डोळ्यांभोवतालचे पांढरे वर्तुळ,नेत्रानजीकची पांढरी पट्टी,ठिपक्या-ठिपक्यांचे पंख व पाठीवरील इंग्रजीतील V आकाराचा बदामी रंगाचा पट्टा चटकन नजरेत भरतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →