भाषालंकार

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अलंकार म्हणजे कोणतेही गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा होय. मराठीत असलेले बहुतेक अलंकार हे संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.

अलंकारांचे मुख्य दोन प्रकार आहेत: १) शब्दालंकार आणि २) अर्थालंकार.

यमक, अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. हे अलंकार शब्दांच्या बनावटीवर अवलंबून असतात. यात शब्दाच्या अर्थाचा विचार नसतो. उपमा, उत्प्रेक्षा आदी अर्थालंकार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →