भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग

भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग हा १,३६० किमी (८५० मैल) लांबीचा चौपदरी महामार्ग आहे जो मोरे (मणिपूर, भारत) ते मंडाले (म्यानमार) ते माई सोट (थायलंड) या शहरांना जोडेल.

या रस्त्यामुळे आसियान-इंडिया फ्री ट्रेड एरिया तसेच आग्नेय आशियाच्या उर्वरित भागामध्ये व्यापाराला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. भारताने कंबोडिया, लाओस आणि व्हियेतनामपर्यंत ह्या महामार्गाचा विस्तार करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्तावित अंदाजे ३,२०० किमी (२,००० मैल) भारत ते व्हियेतनाम हा मार्ग पूर्व-पश्चिम इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. हा महामार्ग चिंदविन नदीवरील काले आणि मोनीवा येथे विकसित होत असलेल्या नदीवरील बंदरांना देखील जोडेल.

डिसेंबर २०२० मध्ये, बांगलादेशने ढाका येथून दळणवळण वाढवण्यासाठी महामार्ग प्रकल्पात सामील होण्यासाठी अधिकृत स्वारस्य व्यक्त केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →