भारतीय नाविक बंड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारतीय नाविक बंड

भारतीय नाविक बंड (याला राॅयल इंडियन नेव्ही म्युटिनी (शाही भारतीय नौदलाचे बंड) किंवा मुंबईचे बंड किंवा नाविक उठाव या नावाने ओळखले जाते) हे ब्रिटिश भारतीय आरमारामध्ये झालेले बंड होते. याची सुरुवात १८ फेब्रुवारी, १९४६ रोजी जहाजांवर आणि किनाऱ्यावरील आस्थापनांमध्ये, शाही भारतीय नौदलातील नाविकांच्या संपाने झाली. त्यानंतर मुंबईमध्ये उघड बंडाची सुरुवात होऊन हे लोण कराची ते कोलकाता असे पूर्ण ब्रिटिश भारतात पसरले आणि तेथील नाविकांकडून त्याला पाठिंबा मिळाला. यात ७८ जहाजांमधील २०,००० पेक्षा जास्त नाविक आणि किनाऱ्यावरील आस्थापनांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ब्रिटिश सरकारने हे बंड ब्रिटिश सैनिक आणि शाही नौदलाच्या युद्धनौकांचा बळाचा वापर करून चिरडले. यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने या संपाचा निषेध केला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →