भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१५-१६

दिनांक १२ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यावर पाच एकदिवसीय सामने व तीन २०-२० सामने खेळविले गेले.

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका ४-१ अशी जिंकली. ह्या एकदिवसीय मालिकेमध्ये फलंदाजांनी एकूण ३,१५९ धावा केल्या. दोन देशा दरम्यान खेळविल्या गेलेल्या पाच किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या मालिकेचा हा विश्वविक्रम आहे. तसेच या मालिकेमध्ये एकूण फलंदाजांनी ११ शतके झळकाविली, हा सुद्धा एक विक्रमच आहे.

भारताने टी२० मालिका ३-० अशी जिंकत आय.सी.सी. टी२० चॅम्पियनशीप मध्ये पहिला क्रमांक मिळविला. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आठव्या क्रमांकावर फेकला गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →