भारतीय कृषी संशोधन परिषद

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भारतीय कृषी संशोधन परिषद

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही कृषी आधारीत संशोधन संस्था असून आय.सी.ए.आर.चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद ही भारत सरकारच्या कृषी मंत्रालय, भारत सरकारच्या कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग (DARE) अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. ही संस्था संपूर्ण देशात फलोत्पादन, मत्स्य पालन आणि प्राणी विज्ञान यासह कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणाचे समन्वय, मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणारी सर्वोच्च संस्था आहे.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने आपल्या संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाद्वारे भारतातील हरितक्रांती आणि त्यानंतरच्या कृषी क्षेत्रात घडामोडी घडवून आणण्यात अग्रणी भूमिका बजावली आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणाली मोठ्या प्रमाणावर, समाजाच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या प्रगतीचा उपयोग करण्यासाठी कटिबद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →