भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) हा भारतातील मार्क्सवादी-लेनिनवादी-माओवादी प्रतिबंधित कम्युनिस्ट राजकीय पक्ष आणि नक्षली संघटना आहे. ज्याचा उद्देश नागरी युद्धाच्या माध्यमातून "अर्ध-औपनिवेशिक आणि अर्ध-सरंजामी भारतीय राज्य" उलथून टाकणे हे होते. या पक्षाची स्थापना २१ सप्टेंबर २००४ रोजी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) पीपल्स वॉर (पीपल्स वॉर ग्रुप) आणि माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया (MCCI) यांच्या विलीनीकरणाद्वारे झाली. इस १९६७ पासून पश्चिम बंगालमध्ये कट्टरपंथी माओवाद्यांनी केलेल्या नक्षलबारी बंडाच्या संदर्भात सीपीआय (माओवादी) यांना अनेकदा नक्षलवादी म्हणून संबोधले जात होते. इस २००८ पासून बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा अंतर्गत या पक्षाची भारतातील दहशतवादी संघटना म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
इस २००६ मध्ये, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवाद्यांचा भारतासाठी "सर्वात मोठे अंतर्गत सुरक्षा आव्हान" म्हणून उल्लेख केला आणि म्हणले की "लोकसंख्येतील वंचित आणि दुरावलेले वर्ग" हे माओवादी चळवळीचा कणा बनतात. सरकारी आकडेवारी नुसार, २०१३ मध्ये देशातील ७६ जिल्हे " नक्षल दहशतवाद " मुळे प्रभावित झाले होते, तर आणखी १०६ जिल्हे वैचारिक प्रभावात होते. २०२० मध्ये तेलंगणा आणि इतर भागात पक्षाच्या हालचाली पुन्हा वाढू लागल्या.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?