भारतात दरवर्षी लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची सामूहिक सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे होत आहेत. धर्मांतरित बौद्धांना आंबेडकरवादी बौद्ध किंवा नवबौद्ध सुद्धा म्हणले जाते.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये ८४ लाखांहून अधिक बौद्ध आहेत आणि त्यापैकी ८७% म्हणजेच ७३ लाख हे धर्मांतरित बौद्ध आहेत, जे इतर धर्मांतून धर्म बदलून बौद्ध बनलेले आहेत. त्यामध्ये बहुतेक अनुसूचित जातीचे आहेत, ज्यांनी हिंदू धर्मातील जातीभेदामुळे धर्मांतर केले आहे. इतर १३% बौद्ध हे पूर्वोत्तर आणि उत्तरी हिमालयीन क्षेत्रीय पारंपरिक बौद्ध समुदायाशी संबंधित आहेत.
धर्मांतरित बौद्धांत सुमारे ७३ लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी ६५ लाख (९०%) महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत ६% बौद्ध आहेत, आणि यातील ९९.९८% धर्मांतरित बौद्ध आहे. उर्वरित सुमारे ९ लाख धर्मांतरित बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत.
भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.