भारताचे उपराष्ट्रपती

थोडक्यात पण महत्त्वाचे.

भारताचे उपराष्ट्रपती

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, महाभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतात. तसेच उपराष्ट्रपती हे संसदेच्या राज्यसभा सदनाचे पदसिद्ध सभापती देखील असतात. १२ सप्टेंबर इ.स. २०२५ रोजी सी.पी. राधाकृष्णन यांची १५वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →