भारत जोडो यात्रा (इंग्रजी : युनायटेड इंडिया मार्च) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेले एक जनआंदोलन आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनतेला एकत्रित करून, भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत १५० दिवसांत ३,५७० किलोमीटर अंतरावर पायी चालत जाण्यासाठी चळवळीचे आयोजन करत आहेत.
नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कथित "विभाजनाच्या राजकारणा" विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही चळवळ सुरू केल्याचे काँग्रेसने म्हणले आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हे आंदोलन सुरू केले. याचे मुख्य उद्दिष्ट "भिती, धर्मांधता आणि पूर्वग्रह" यांच्या राजकारणाविरुद्ध आणि उपजीविकेचा नाश, वाढती बेरोजगारी आणि वाढत्या असमानतेच्या विरोधात लढा देणे आहे. या आंदोलनादरम्यानच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली.
भारत जोडो यात्रा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.