ब्रेन स्ट्रोक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ब्रेन स्ट्रोक

मेंदूला पुरेसा प्राणवायूचा पुरवठा न मिळाल्याने मेंदूच्या पेशी मृत होतात. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण होतो. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा,याला ब्रेन ॲटॅक असंही म्हटलं जातं. रक्तामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अथवा मेंदूला रक्त पुरवठा करणारी धमनी फाटली असता हा त्रास उद्भवू शकतो. यामुळे कायमस्वरूपी मज्जातंतूची हानी होऊन रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. याबाबत बहुसंख्य लोकांना माहिती नसते. चालू तासांच्या आत विशिष्ट गुठळी कमी करण्याकरिता उपाय केले गेले नाहीत तर मृत्यू ओढवू शकतो.

छातीत धडधडण ही गोष्ट वरकरणी साधी वाटली तरीही प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.त्याच बरोबर धाप किंवा अस्वस्थता वाटत असेल तर ही कदाचित ब्रेन स्ट्रोकच्या अटॅकची लक्षणही असू शकतात.उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.



ब्रेन स्ट्रोक एक घातक रोग आहे आजकल १० पैकी ६ व्यक्ती कधी न कधी स्ट्रोकच्या समस्याचे शिकार होतात बहुतेक वाढत्या युगामध्ये अशा प्रकारच्या समस्या दिसतात ज्या कारणाने बऱ्याच वेळा मानवी व्यक्तीचा मृत्यूही होतो. ब्रेन स्ट्रोक येण्यानंतर रुग्णांना बहुतेक त्यांच्या बोलण्यातून आणि ऐकण्याची शक्ती गमावून बसतो.जीवन जगण्यासाठी त्यांना दुसऱ्या लोकांचा सहारा घ्यावा लागतो.या व्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये अडचणी, शरीराचा एक भाग सुन्न पडणे, मासपेशींमध्ये कमजोरी येणे इत्यादी अनेक प्रकारची समस्या आहे.



ब्रेन स्ट्रोक झाल्यावर मेंदूत गुठळ्या होतात.उत्तर गुठळ्या हृदयाकडून मेंदूपर्यंत पोहोचतात.ह्या गुठळ्या विरघळवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल इंजेक्शन घ्यावे लागतात.हृदयाचे ठोके अनियमित असतील तर आणि त्यावर वेळेत उपचार केले नाही तर त्याचा गुठळ्या तयार होतात.या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचतात.त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होतो.आणि हृदय बंद पडते.

हि समस्या जगभरात आढळून येते.आणि दिवसेंदिवस त्याचे प्रमाण वाढत चालले आहे.या संदर्भात २०१० साली लोकसंख्येवर आधारित करण्यात आलेल्या पाहणीत तीन कोटी ३५ लाख व्यक्तींमध्ये हृदयाचे ठोके अनियमित असल्याचे आढळून आले आणि यात दरवषी सुमारे ५० लाख व्यक्तींची भर पडत आहे.हि काळजी करण्यासारखी बाब आहे.कारण यामुळे हृदयात गुठळ्या तयार होऊन त्या शरीरातील इतर अवयवपर्यंत विशेषतः मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →