ब्रिटिश राज

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ब्रिटिश राज

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत, पाकिस्तान व बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →