बोगीबील ब्रिज

या विषयावर तज्ञ बना.

बोगीबील ब्रिज

बोगीबील ब्रिज (असमीया भाषा: বগীবিল / बगीबिल ; उच्चार : बोगीबील) हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला भारताच्या आसाम राज्यातील एक पूल असून यावर रेल्वेमार्ग व गाडीरस्ता हे दोन्हीही आहेत. हा पूल आसामच्या धेमाजी आणि दिब्रुगढ यांना जोडतो. या पुलाचे बांधकाम २१ एप्रिल २००२ रोजी सुरू होऊन डिसेंबर २०१८मध्ये पूर्ण झाले. पूल ४.६ किमी लांबीचा असून भारताचा चौथा सर्वात मोठा पूल व आशियातील दुसरा सर्वात लांब रेल-कम-रोड आहे. या ठिकाणी पर्यटक हिवाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →