बुद्ध म्हणजे असा व्यक्ती ज्याने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, आणि ज्याला चार आर्यसत्यांची पूर्ण जाणीव आहे. "बुद्ध" हा शब्द सर्वसाधारणपणे बौद्ध धर्माचे गुरू आणि संस्थापक सिद्धार्थ गौतम यांचा उल्लेख आहे, ज्यांना "गौतम बुद्ध" असेही म्हणले जाते. इतरांनी या शब्दाचा अर्थ काढला 'ज्याने ज्ञान (बोधी) आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे, जसे गौतम, अमिताभ आणि भविष्यातील बुद्ध, मैत्रेय यांच्या पूर्वीचे २७ बुद्ध.
बुद्ध हे व्यक्तीचे नाव अथवा पद नसून ते मनाच्या स्थितीचे किंवा अवस्थेचे नाव आहे. मनाची अशी अवस्था की, जी मानसिक विकासाच्या अत्युच्च शिखरावर पोहचली आहे. बुद्ध म्हणजे ज्याला सम्यक संबोधीची प्राप्ती झाली आहे असा सम्यक सम्बुद्ध किंवा ज्याला परिपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहे असा. पाली भाषेत याला सर्वज्ञ (अमर्यादित ज्ञानी) म्हणले आहे.
बुद्ध (शीर्षक)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.