बी. रघुनाथ

या विषयावर तज्ञ बना.

भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी. रघुनाथ (२५ ऑगस्ट, १९१३ - ७ सप्टेंबर, १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते.

बी. रघुनाथ यांचा जन्म २५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.

बी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले. त्यांचे जवळचे मित्र श्री.भास्कर वासुदेव हसेगावकर, छत्रपती संभाजीनगर (वय - ९३ ,२०२५ मधे) आहेत, श्री.भास्कर हे सेवानिवृत्त शिक्षक असून लेखक, कवी, वाचक, गायक इ.आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →