बिन्यामिन नेतान्याहू (मराठी नामभेद: बेंजामिन नेतान्याहू ; हिब्रू: בִּנְיָמִין "בִּיבִּי" נְתַנְיָהוּ ; रोमन लिपी: Benjamin Netanyahu; २१ ऑक्टोबर, इ.स. १९४९) हे इस्रायल देशाचे विद्यमान पंतप्रधान आहेत. तत्पूर्वी जून, इ.स. १९९६ ते जुलै, इ.स. १९९९ या कालखंडातही त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळली. हे लिकुड पक्षाचा विद्यमान अध्यक्ष आहेत.
बिन्यामिन नेतान्याहू हे इज्राइलचे प्रथम पंतप्रधान आहेत, ज्यांचा जन्म देशाची स्थापना झाल्यावर झाला. त्यांचे बालपण जेरुसलेम मध्ये गेले. नेतान्याहू यांना 'बीबी' या टोपण नावाने ओळखले जाते.
भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांनी निवृत्ती घेतली होती, २००२ साली परत त्यांनी परराष्ट्रीय मंत्री म्हणून धुरा सांभाळली.
बिन्यामिन नेतान्याहू
यामागील विज्ञान आणि इतिहास.