बिटटॉरेंट

या विषयावर तज्ञ बना.

बिटटॉरेंट (BitTorrent) हे 'पिअर-टू-पिअर' पद्धतीने संगणक फाईल्स् वितरण करण्यासाठीच्या एका प्रोटोकॉलचे नाव आहे. तसेच, ह्या प्रोटोकॉलचा उपयोग करणाऱ्या एका मुक्त सॉफ्टवेरलाही 'बिटटॉरेंट' ह्या नावाने ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात असलेल्या कोणत्याही डिजिटल माहितीचे (दृक/श्राव्य माध्यम व इतर विविध स्वरूपातील) इंटरनेटवरून वितरण करण्यासाठी बिटटॉरेंटचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, बिटटॉरेंटचा वापर करून गाणी, सिनेमा वा टेलिव्हिजनचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर वितरीत केले जातात.

बिटटॉरेंट प्रोटोकॉलची रचना सर्वप्रथम 'ब्रॅम कोहन' ह्या अमेरिकन प्रोग्रॅमरने केली. सध्या 'बिटटॉरेंट इनकॉर्पोरेटेड (BitTorrent Inc.)' ही कंपनी बिटटॉरेंटचा पुढील विकास करते.

माहिती वितरणाच्या काही पद्धतींचा (उदा. वेब सर्व्हर / FTP सर्व्हर) वापर करताना, वितरण करणाऱ्या संगणक आणि नेटवर्कवर अतिशय मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. (विशेषतः, मोठ्या प्रमाणावरील डिजिटल माहिती बऱ्याच लोकांना वितरित करताना.) अश्या प्रकारचा ताण कमी करणे हे बिटटॉरेंट प्रोटोकॉलच्या रचनेमागील एक मुख्य उद्दिष्ट्य होते.

बिटटॉरेंट प्रोटोकॉल हा मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे. सार्वजनिक संशोधन करणाऱ्या काही कंपन्यांचा दावा आहे की इंटरनेटवरील बॅडविड्थ(नेटवर्कची माहिती वाहनक्षमता)च्या जवळपास ३५ टक्के क्षमता ही बिटटॉरेंटच्या वापरासाठी खर्च होते. केबललॅब्स् (उत्तर अमेरिकेत केबल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्याची संशोधन संस्था) ही संस्था दावा करते की केबल इंटरनेट नेटवर्कवरील बहुतांश 'Upstream' बॅडविड्थ ही बिटटॉरेंटने वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →