बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण (ईसीई : अर्ली चाईल्डहूड एज्युकेशन) , ( बापूसंशि ; अर्थात नर्सरी प्रशिक्षण ) ही, वय वर्षे आठपर्यंतच्या लहान मुलांच्या (औपचारिक आणि अनौपचारिक) शिक्षणाशी संबंधित असलेली शिक्षण सिद्धांताची शाखा आहे. अर्भक/लहान बाळ शिक्षण हा बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षणाचाच एक उपसंच असून, त्यामध्ये जन्मापासून ते वय वर्षे दोनपर्यंतच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा समावेश केला जातो.

ही शाखा प्रबोधन काळामध्ये, खासकरून उच्च साक्षरता प्रमाण असणाऱ्या युरोपीय देशांमध्ये शिक्षणाचे एक क्षेत्र म्हणून विकसित पावली. एकोणीसाव्या शतकामध्ये यामध्ये सतत विकास होत होत पाश्चिमात्य जगामध्ये वैश्विक प्राथमिक शिक्षण म्हणून सर्वसामान्यपणे मान्यताप्राप्त झाले. शाळापूर्व अंगणवाडी आणि बालवाडीला स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य आणि संघीय कायदेमंडळ निधी पुरवित असल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये, बाल्यावस्था पूर्व संगोपन शिक्षण हा सर्वसाधारणपणे जाहीर धोरणाचा मुद्दा बनला आहे. हा मुलाच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मुलाच्या सर्वांगीण व्यक्तीमत्व विकासाकडे यामध्ये लक्ष दिले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →