बाजरी

या विषयावर तज्ञ बना.

बाजरी

बाजरी(शास्त्रीय नाव:Pennisetum glaucum) हे एक प्रकारचे भरड धान्य आहे. बाजरीच्या पिकाला कमी पाऊसपाणी (वार्षिक सरासरी पर्जन्यमान < २०० मिमी.) लागते. बाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिका येथील काही देशांत मोठ्या प्रमाणावर खाण्यासाठी केले जाते तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशात त्याचे उत्पादन मुख्यत्वेकरून पशुपक्ष्यांच्या खाद्यासाठी केले जाते. बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी - प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी - मोठ्या प्रमाणावर केला जातो.महाराष्टातील ग्रामीण भागात बाजरीपासून वाळवणाचे पदार्थ बनवले जातात.तसेच काही धार्मिक सणावारामध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते.

एक तृणधान्य. बाजरी ही एकदलिकित वनस्पती पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पेनिसेटम ग्लॉकम आहे. पे. टायफॉइडस अशा शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. बाजरीचे मूलस्थान पश्‍चिम आफ्रिकेतील असून भारतात ती प्राचीन काळापासून लागवडीखाली आहे. इ.स.पू. २५००–२००० या कालावधीत भारतामध्ये बाजरी लागवडीखाली आली असावी, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. गहू व भात या वनस्पतीही पोएसी कुलातील आहेत. उच्च तापमान, कमी सुपीक जमीन तसेच आम्लयुक्त किंवा क्षारयुक्त जमीन असली, तरी बाजरीची वाढ होते. दुष्काळासारख्या परिस्थितीत हे पीक तग धरून राहते. ज्या परिस्थितीत गहू व मका ही पिके येत नाहीत अशा परिस्थितीत बाजरीचे पीक वाढू शकते.

या पिकावर कवकजन्य असलेल्या अरगट या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

बाजारीवर प्लास्मो पेनिनिसेती हा रोग पडतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →