बर्किना फासो (फ्रेंच: Burkina Faso) हा पश्चिम आफ्रिकेतील एक भूपरिवेष्टित देश आहे. बर्किना फासोच्या भोवताली माली, बेनिन, टोगो, नायजर, घाना व आयव्हरी कोस्ट हे सहा देश आहेत. वागाडुगू ही बर्किना फासोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०१० साली ह्या देशाची लोकसंख्या १.५ कोटी इतकी होती.
१९व्या शतकापासून फ्रेंच पश्चिम आफ्रिका ह्या फ्रान्सच्या वसाहतीचा भाग असलेल्या बर्किना फासोला १९६० साली स्वातंत्र्य मिळाले व १९८४ सालापर्यंत तो अप्पर व्होल्टाचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे. १९८४ साली राष्ट्राध्यक्ष थॉमस संकराने देशाचे नाव बदलून बर्किना फासो असे ठेवले. १९८७ सालच्या एका लष्करी बंडामध्ये संकाराची सत्ता उलथवून ब्लेस कोंपाओरे राष्ट्राध्यक्षपदावर आला व तो आजवर ह्या पदावर आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे बर्किना फासो गरीब व अविकसित आहे. दरडोई उत्पनामध्ये बर्किना फासो जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. बर्किना फासोचा मानवी विकास सूचक जगात खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
बर्किना फासो
यामागील विज्ञान आणि इतिहास.