फ्रांसेस लुईझ मॅकडॉर्मंड (जन्मनाव: सिंथिया ॲन स्मिथ; २३ जून, १९५७ - ) एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि निर्माता आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, त्यांनी छोट्या-बजेटच्या स्वतंत्र चित्रपटांमधील भूमिकांसाठी वाहवा मिळवली आहे. मॅकडॉर्मंडला चार अकादमी पुरस्कार, दोन एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार यासह असंख्य प्रशंसा मिळाली आहेत, ज्यामुळे "अभिनयाचा तिहेरी मुकुट" प्राप्त करणाऱ्या काही कलाकारांपैकी त्या एक बनल्या आहे. याव्यतिरिक्त, तीन बाफ्टा आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रांसेस मॅकडॉर्मंड
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.