प्लेझंटव्हिल हा १९९८ मध्ये प्रदर्शित अमेरिकन विनोदी -नाट्य चित्रपट आहे. गॅरी रॉसने दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट होता. त्याने हा चित्रपट सह-निर्मित सुद्धा केला होता. यात टोबी मॅग्वायर, जेफ डॅनियल्स, जोन अॅलन, विल्यम एच. मेसी, जे.टी. वॉल्श आणि रीझ विदरस्पून यांच्या भूमिका आहेत. याशिवाय डॉन नॉट्स, पॉल वॉकर, मार्ली शेल्टन आणि जेन काझमारेक हे सहाय्यक भूमिकेत आहेत. ही कथा दोन भावंडांवर केंद्रित आहे जे १९५० च्या दशकातील एका दूरचित्रवाणी मालिकेतत अडकतात. अमेरिकेच्या मिडवेस्टमधील प्लेझंटव्हिल नावाच्या छोट्या शहरात घडत असलेल्या या मालिकेतील प्रत्येक पात्र अगदी आदर्श असते. येथे काहीही अजोगते घडत नाही आणि गावाबाहेर जगच नाही.
या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, जरी तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. ६ कोटी डॉलर खर्च करून तयार केलेल्या या चित्रपटाने सुमारे ५ कोटी डॉलर कमावले. हा चित्रपट जे.टी. वॉल्शच्या शेवटच्या चित्रपटांपैकी एक होता. त्यांच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यांच्या स्मृतीला समर्पित होता. डॉन नॉट्सची सुद्धा ही पडद्यावरील शेवटची भूमिका होती. यानंतर त्यांनी फक्त ध्वनिमुद्रण करायच्या भूमिका केल्या.
प्लेझंटव्हिल (चित्रपट)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.